Share

गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात २०२० च्या सुरुवातीपासून कोरोनाने घातलेलं थैमान आजही कायम आहे. कोरोनावर मात करण्यासाठी तसेच रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांचे सर्वात मोठ योगदान राहिले आहे. डॉक्टरांनी कोरोना विरुद्ध दिवसरात्र लढा दिला. यामुळे आतापर्यंत आपण पहिली आणि दुसरी लाट थोपवली आहे. पण दुर्देवाने कोरोना विरुद्ध लढताना अनेक डॉक्टरांना जीवाला मुकावे लागले. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत ७७६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या लाटेत बिहारमध्ये सर्वाधिक ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. यानंतर राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत १०९ यानंतर उत्तर प्रदेशात ७९, पश्चिम बंगालमध्ये ६२, तामिळनाडूमध्ये ५०, आंध्र प्रदेशात ४०, आसाममध्ये १०, गुजरातमध्ये ३९ आणि झारखंडमध्ये ३९ डॉक्टरांचा मृत्यू झाला. याशिवाय मध्य प्रदेशात १६, महाराष्ट्रात २३, ओडिशामध्ये ३४, राजस्थानमध्ये ४४ आणि तेलंगणामध्ये ३७ डॉक्टरांचा मृत्यू झाला.

संसर्गाची पर्वा न करता या डॉक्टरांनी रुग्णसेवा करताना दिलेले हे बलिदान आहे. मात्र त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केली. मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्ध्यांची माहिती आयएमए गोळा करत आहे. सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारने या माहितीचे संकलन करायला हवे. जे डॉक्टर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यायला हवे. तसेच संसर्ग झाल्यास निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घ्यायला हवे, अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!