Share

औरंगाबादेत अनेक भागांमध्ये आठव्या दिवशीही निर्जळी, मनपाचे पाणीपुरवठा अधिकारी ‘आऊट ऑफ रिच’!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. हि योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी साधारणपणे १५ ते २० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी पाण्यासाठी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठ दिवस उलटूनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी आलेले नाही. पाण्याविषयी विचारणा करण्यासाठी नागरिकांनी मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अतिशय जुन्या झाल्या आहेत.

त्यामुळे मुख्य जलवाहिन्यांना सुस्थितीत ठेवून शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला चोवीस तास कसरत करावी लागते. गेल्या महिनाभरात दोन ते तीन वेळा पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अनेकदा विस्कळीत झाला होता. शहरातील एन-३, एन-४ भागात आज पाणीपुरवठा न होण्याचा आठवा दिवस आहे.

शुक्रवार असल्याने चार तासांसाठी लोडशेडिंग असणार आहे. यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. संतप्त नागरिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगितले. मयुर नगर, नवजीवन कॉलनीत पाण्याचा वॉल खराब झाल्यामुळे आज पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

आज एन-३, एन-४ भागात पाणी न येण्याचा आठवा दिवस आहे. १० ते २ यावेळेत लाईट जाणार असल्याने यावेळेत पाणीपुरवठा करु नये यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. वेळी-अवेळी पाणी येणे, समस्या निर्माण झाल्यास १० दिवस उलटूनही पाणी येत नाही. पाण्याची वेळ वारंवार बदलली जाते. त्यामुळे नेमके पाणी कधी येणार याविषयी नागरिकांना अचूक माहिती मिळत नाही. आज सकाळपासून मनपा अधिकाऱ्यांना संपर्क साधत आहोत मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. अशी प्रतिक्रिया नागरीक मनोज बोरा यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!