मुंबई : २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्वीट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ‘पदासाठी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे आणीबाणी’ अशी टीका त्यांनी केलीय.
यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे ट्विट रिट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिलेय. ‘आणीबाणी बद्दल बोलण्याचा संघ आणि भाजपाला नैतिक अधिकार नाही’ असा पलटवार सावंत यांनी केलाय.
देशाला व संघाच्या कार्यकर्त्यांना हे माहीत असणे आवश्यक आहे की तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सपशेल माफी मागून वीस कलमी कार्यक्रमाचा प्रसार करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आणीबाणी बद्दल बोलण्याचा संघ आणि भाजपाला नैतिक अधिकार नाही. https://t.co/GAWOLCHRo7
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 25, 2021
‘देशाला व संघाच्या कार्यकर्त्यांना हे माहीत असणे आवश्यक आहे की तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सपशेल माफी मागून वीस कलमी कार्यक्रमाचा प्रसार करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आणीबाणीबद्दल बोलण्याचा संघ आणि भाजपाला नैतिक अधिकार नाही’ असे ट्विट सचिन सावंत यांनी केलेय.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
‘न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा यांची परस्परपूरकता आणीबाणीच्या काळात धोक्यात आली आणि त्याचा परिणाम सर्व भारतीयांना भोगावा लागला. आपले पद वाचवण्यासाठी कुटुंबकेंद्रित पक्षात सर्वोच्चस्थानी असणारी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा हा जिवंत वस्तुपाठ आहे’ असे पाटील म्हणाले.
आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी ट्विटद्वारे आणीबाणीवर भाष्य केलेय. ‘१९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती. असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
- ‘गोपीनाथ मुंडे नसले तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय’, पंकजा मुंडेंचे आवाहन
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

