Share

डब्ल्युटीसी फायनल! लढवय्या वॅटलींगच्या कारकिर्दीचा गोड ‘दिग्विजया’ने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. ७ गडी बाद करणाऱ्या न्युझीलंडचा गोलंदाज कायली जेमीसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यापुर्वी न्युझीलंड संघाचा यष्टीरक्षक बीजे वॅटलींगने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना हा बीजेच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. हा सामना जिंकत बीजेने कारकिर्दीचा शेवट गोड केला. या सामन्यात बीज फलंदाजीत फारशी चमक दाखवु शकला नाही. मात्र यष्टीमागे त्याने ५ झेल घेत संघाच्या विजयात योगदान दिले. महत्वाची बाब म्हणजे रविंद्र जडेजाला धावबाद करताना बीजेचे एक बोट तुटले होते. मात्र लढवय्या बीजेने मैदान न सोडता भारताचा संपुर्ण डाव संपेपर्यंत यष्टीरक्षण केले.

बीडे वॅटलिंगने न्युझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये ७५ सामने खेळलेला आहे. यात त्याने ३७.५२ च्या सरासरीने ३७९० धावा केल्या आहेत. त्याने कारकिर्दीत आठ शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहे. मात्र अंतिम सामन्यात तो केवळ एकच धाव करु शकला. बीजे वॅटलिंग हा न्युझीलंडकडुन यष्टीमागे सर्वात जास्त बाद करणारा यष्टीरक्षक आहे. तसेच न्युझीलंडकडुन यष्टीरक्षक म्हणून सर्वात जास्त धावा आणि सर्वोत्तम खेळी ही वॅटलिंगच्या नावे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!