Share

उद्धवजी… राज्याच्या समोर समस्यांचा डोंगर… २ दिवसांच्या अधिवेशनात प्रश्न मांडायचे तरी कसे ?

Published On: 

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकार आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची काल बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या निषेधाकडे आणि आरोपांकडे जरी दुर्लक्ष केले तरीही राज्याच्या विविध भागातील समस्या लोकप्रतिनिधींनी मग नेमक्या मांडायच्या तरी कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. आज शेतकरी, गरिब, विद्यार्थी आणि इतरही सर्वसामान्य घटकांचे अनेक प्रश्न आहेत. विदर्भातील धान, सोयाबीन उत्पादक, उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक, कोकणातील शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. लागोपाठ दोन वादळांनी त्यांना मोठा फटका बसूनही कोणतीही मदत त्यांना मिळालेली नाही याबाबत दाद मागायची तरी कुठे असा देखील सवाल आहे.

विजेच्या प्रश्नावर राज्य सरकारने पूर्णत: घोळ घातला आहे. लोकांकडून मनमानी वसुली केली जाते आहे. लागोपाठ शाळा, महाविद्यालये बंद असताना, परीक्षा होत नसताना विद्यार्थ्यांचेही मोठे प्रश्न आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती रसातळाला गेली आहे. पण, कोणत्याही विषयावर राज्य सरकारला चर्चा नको आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने या दोन्ही समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. या दोन्ही विषयांवर स्वतंत्र अधिवेशने घेण्याच्या मागण्या होत आहेत. पण, नियमित अधिवेशनात सुद्धा त्यावर चर्चा होऊ नये, असाच प्रयत्न राज्य सरकारचा दिसून येतो.

एका बाजूला कोरोनाची लाट ओसरत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत असताना मग सरकार हा पळपुटेपणा का करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. या अधिवेशनापेक्षा मागील अधिवेशन काळात कोरोनाची गंभीर परिस्थिती असून देखील अधिवेशनाचा काळ या अधिवेशनापेक्षा जास्त होता मग आता सरकारकडून ही भूमिका का घेण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!