Share

ड्ब्ल्युटीसी फायनल! गीलला बाद करताच साउथीने रचला ‘हा’ विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.

या सामन्यात पाचव्या दिवशी भारतीय संघाने २ गडी गमावत ६४ धावांची मजल मारली होती. भारताचे दोन्ही सलामीवीराना टिम साउथीने माघारी तंबुत पाठवले. यादरम्यान भारताचा सलामीवीर शुभमन गीलचा बळी हा टीम साउथीचा ६००वा आंतरराष्ट्रीय बळी ठरला. अशी कामगीरी करणारा तो न्युझीलंडचा केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. पहिल्या स्थानी न्युझीलंडचा माजी फिरकीपटु डॅनीयल व्हिक्टोरी आहे. व्हिक्टोरीने ६९६ गडी बाद केले आहे.

आज सामन्याचा अखेरचा दिवस आहे. भारतीय संघाचा दुसरा डाव सुरु आहे. सामन्याचा निर्णय लागण्यासाठी किमान संपुर्ण दिवसाचा खेळ होणे अपेक्षीत आहे. तसेच या सामन्याचा निकाल हा संपुर्णपणे गोलंदाजावर अवलंबुन आहे. न्युझीलंड आणि भारत दोन्ही संघाच्या गोलंदाजाची कामगिरी जवळपास सारखीच राहिली आहे. मात्र अखेरच्या दिवशी खेळपट्टी कशा प्रकारे गोलंदाजाना मदत करते यावर अवलंबुन आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!