लाहोर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईदच्या पाकिस्तानातील लाहोरच्या जोहर टाऊन येथील घराबाहेर स्फोट झाला आहे. डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार जौहर टाऊनमध्ये झालेल्या या हल्ल्यात 12 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा स्फोट शहरातील एहसान मुमताज हॉस्पिटलच्या ई ब्लॉकजवळ झाला. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले आहे. हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच एका घरात हा स्फोट झाला आहे. या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
अॅम्ब्युलन्स सर्व्हिसचे प्रवक्त्यांनी स्फोट कोणत्या कारणामुळे घेण्यात आला याबाबत अद्याप माहिती समोर आली नसल्याचं सांगतिल. गॅसपाईप लाईन फुटल्यानं किंवा सिलेंडर फुटल्यानं स्फोट झाला काय याची माहिती घेण्यात असल्याचं अधिकाऱ्याकंडून सांगण्यात आलं आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटात आतापर्यंत 12 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट कोणत्या कारणानं झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- २६ जूनचे ‘चक्का जाम’ आंदोलन भाजपमधील ओबीसी नेत्यांनी प्रतिष्ठेचे का बनवले आहे ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

