Share

परमबीर सिंह यांना ५ हजारांचा दंड ; ‘या’ मदतनिधीत पैसे जमा करण्याचे निर्देश

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने मंगळवारी 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल समिती करत आहे. दरम्यान काल न्यायमूर्ती चांदिवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना पाच हजारांचा दंड बजावण्यात आला आहे. हे पैसे मुख्यमंत्री कोविड निधीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

सचिन वाझे यांनाही काल चांदिवाल आयोगापुढे हजर करण्यात आलं होतं. आयोगानं समन्स बजावून सचिन वाझेंना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्यात आलं. मात्र वाझेंनी आयोगापुढे अर्ज करत जबाब देण्यासाठी वेळ मागून घेतली. हा अर्ज स्वीकारत आयोगानं त्यांना 5 जुलैपर्यंतची मुदत देत त्यादिवशी त्यांना पुन्हा आयोगासमोर हजर करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

चांदिवाल समितीस चौकशी आयोग अधिनियम 1952 मधील कलम 4,5 अ, 8,9 नुसार दिवाणी आणि अनुषंगिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ही समिती याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर संस्थांकडे सोपवण्याची शिफारस करु शकते. सहा महिन्यांमध्ये चांदिवाल समितीकडून चौकशीला अहवाल सादर करण्यात करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!