🕒 1 min read
इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली.
या सामन्यात ५ व्या दिवशी मोहम्मद शमी याने चांगली गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट घेतल्या. पण या सोबत तो आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. साउथम्पटनमध्ये ५ व्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी पाऊस झाला. पाऊस थांबल्यानंतर मोहम्मद शमी आपल्या खेळाडूंसोबत पुन्हा मैदानावर आला. पण जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा त्याने अंगाला पांढरा टॉवेल लावला होता. त्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद झाला आणि मैदानावर एकच हशा पिकला.
Shami & his towel- Better love story than twilight pic.twitter.com/mf5uNBc7mR
— tejas (@tejaspotter) June 22, 2021
So much rain in Southampton over the last few days is ensuring player carries towel on the field
????????????????????#Shami#WTCFinal https://t.co/0LWE8zQ3tQ
— Rohan Gulavani (@ImRohanGulavani) June 22, 2021
मोहम्मद शमीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आणि जोक्स व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हयरला होत आहे. त्यासोबतच मोहम्मद शमीवर भन्नाट मिम्स देखील बनवले जात आहे. तसेच शमीच्या या कृत्यामुळे त्याची बॉलीवूड अभिनेत्री काजोल सोबत तुलना देखील होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
