Share

शिक्षकाला गंडविणाऱ्या ‘त्या’ तोतया ‘निजामा’ला पोलीस कोठडी

Published On: 

औरंंगाबाद : निजामाचा वंशज असल्याची थाप मारत फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करुन शिक्षकाला २५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी निजामाचा तोतया वंशज दिलशाद जहा ईमदाद जहा (वय ५७, रा. तेजा कॉलनी, लक्ष्मी नगर, अलकापुर हैदराबाद ह.मु. हडको कॉर्नर औरंगाबाद) याला शनिवारी अटक केली असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले आहेत.

भडकलगेट परिसरातील रहिवासी असलेले शिक्षक मोहम्मद नदीम सलीम पाशा (वय ४६) यांची दिलशाद जहा याच्यासोबत हैदराबादचे नातेवाईकाच्या माध्यमातुन ओळख झाली होती. त्यावेळी दिलशाद जहा याने आपली हिमायतबाग येथे चारशे एकर जागा असून त्यावर जमीर पटेल नावाच्या व्यक्तीने कब्जा केले असल्याचे सांगितले. तसेच जागेच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे नदीम पाशा यांना व्हॉटसअपद्वारे पाठविले होते. त्यात भारताचे राष्ट्रपती व गृह सचिव यांच्याशी पत्र व्यवहार केलेल्या कागदपत्रांचा समावेश होता. दरम्यान, काळात दिलशाद जहा याने नदीम पाशा यांच्याकडून वेळोवेळी करून दहा लाख रूपये घेतलले होते. त्यानंतर दिलशाद जहा याने पैसे परत करण्याऐवजी हिमायत बागेतील एक एकर जागा २५ लाख रूपयांत देतो असे सांगून नदीम पाशा यांच्याकडून आणखी १५ लाख रूपये घेतले होते.

पैसे घेतल्यावर दिलशाद जहा यांनी कोटोतुन जमिनीची नोटरी करून नदीम पाशा यांना दिली होती. नदीम पाशा यांनी निजाम वारसदाराबाबत चौकशी केली असता हिमायतबागेची जाग फळ संशोधन केंद्राची असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी नदीम पाशा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलशाद जहा यांच्याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!