नाशिक : मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकण्यात आल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. नाशिक येथे पार पडलेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमेवत झालेल्या चर्चेत आपल्या प्रमुख मागण्यांची पूर्तता होण्याचे ठोस आश्वासन मिळाले आहे. त्यासाठी, प्रशासकीय पातळीवरील पूर्तता करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी राज्य सरकारने मागितला आहे. पण, आपण 21 दिवसांऐवजी 1 महिन्यांचा कालावधी सरकारला देत आहोत. त्यामुळे, जर 1 महिन्यात आपल्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाही, तर आम्हाला पुढील आंदोलनाची भूमिका ठरवावी लागेल, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच, सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच, 23 जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय करण्यात येणार आहे. ओबीसींप्रमाणेच मराठा समाजालाही सवलती देण्यासाठी सरकार तयार आहे. तसेच, 2185 विद्यार्थ्यांच्या नियुक्तीच्या प्रश्नावरही सरकारने 21 दिवसांचा कालावधी मागितला असून कंटेम्ट ऑफ कोर्ट न होता, विशेष बाब म्हणून किंवा सुपर न्यूमेररीचा वापर करुन त्यांना नियुक्त्या देण्याबाबत अभ्यास करण्यात येत असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले.
दरम्यान ‘कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’ अशी भूमिका यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. तर आंदोलनाला कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्याक्ष नरहरी झिरवळ, सदाभाऊ खोत उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ऑईल सील, हेडलाईट स्वीचसह कारच्या बनावट साहित्यांची विक्री, दोन दुकानांवर कारवाई
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
