Share

‘भाडोत्री चाणक्याला भेटावे लागणे म्हणजे पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आहे. यानंतर आता उद्या शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

गेल्या दोन आठवड्यांत शरद पवार यांनी दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. याआधी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पवार आणि किशोर यांची भेट झाली होती. आता उद्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. पवार-किशोर भेटीवर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

या भेटीवर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘प्रशांत किशोर यांच्यासारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय,’ अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी 4 वाजता पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला 15 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!