मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.
पहिल्या डावात भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघ केवळ २१७ धावांची मजल मारु शकला. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने सराव सामना न खेळल्याने भारतीय फलंदाज अपयशी ठरले आहेत अशी चर्चा सोशल मीडीयावर सुरु आहे. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला होता. यानंतर भारतीय संघाने आपापसात सराव सामना खेळला होता.
तर प्रतिस्पर्धी न्युझीलंड संघाने इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळून डब्ल्युटीसी सामन्यासाठी पुर्णपणे सज्ज झाले होते. या सामन्यात भारताचा पहिला डाव केवळ २१७ धावांवर अटोपला. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी न करता बाद झाले होते. उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधीक ४९ धावांची खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी
- ‘आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही’, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार
- शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे – हसन मुश्रीफ
- कपिल शर्माने पहिल्यांदाच शेअर केला मुलांसोबतचा सुंदर फोटो
- ‘मी इतकंच सांगेन की..’, संभाजीराजेंचे नाशकात लोकप्रतिनिधींना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
