Share

‘आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही’, संजय राऊतांचा भाजपवर प्रहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत, आज आम्ही राजकारणात नाहीये. एक जमाना लोटलाय… केस पांढरे झालेत परत काळे करत आहोत. फार फार काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!