Share

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील स्म्रिती मंधानाच्या ‘त्या’ फोटोवर चाहते घायाळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना भारतीय महिला संघानी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पहिल्या डावात १६५ धावांची आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. फॉलोऑननंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले.

या सामन्यात भारतीय सलामीवीर स्म्रिती मधांनाचा फलंदाजीदरम्यान एक फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी हा फोटो शेअर करत ती बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही चाहत्यांनी बॉलीवूड अभिनेत्रीप्रमाणे स्म्रितीला कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासह काही चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. या सामन्यात स्म्रितीने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावत ७८ धावांची खेळी केली होती.

भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने फॉलोऑन देत दुसऱ्या डावात फलंदाजी साठी पाचारण केले. यानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत पुनरागमन केले. दुसऱ्या डावात भारतीय संघाने ८ गडी गमावत ३४४ धावांची मजल मारत सामना अनिर्णीत राखला. १९९ वर ७ बाद या स्थितीतुन स्नेह राणाने ८० धावांची नाबाद खेळी करत इंग्लंडच्या हाताशी आलेला विजयाचा घास हिरावुन घेतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!