🕒 1 min read
मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.
जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ३ बाद १४६ पासुन पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र केवळ तीन धांवाची भर घालुन कर्णधार कोहली ४४ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतने केवळ ४ धावांची भर घालुन बाद झाला. यादरम्यान अंजिक्य रहाणेने काही काळ संघर्ष सुरु ठेवला. तो बाद झाल्यावर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने काही काळ पडझड थांबवुन ठेवली. दोघांनी भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली. मात्र अश्विन बाद होताच जडेजा जास्त काळा टिकु शकला नाही. आणि ९२.१ षटकात भारताचा संपुर्ण संघ २१७ धावांवर बाद झाला. भारताकडुन पहिल्या डावात उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधीक ४९ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. तर न्युझीलंडकडुन कायली जेमिनसनने सर्वाधीक ५ गडी बाद केले.
#TeamIndia ???????? strike at the stroke of Stumps on Day 3️⃣
Ishant picks half-centurion Conway ????????
New Zealand ???????? lose 2️⃣ wickets
Day 4️⃣ promises to be an exciting one tomorrow #WTC21
Scorecard ???? https://t.co/CmrtWscFua pic.twitter.com/VkQdragnbr
— BCCI (@BCCI) June 20, 2021
दुसऱ्या डावात न्युझीलंडने चांगली सुरुवात करत ७० धावांची अर्धशतकी सलामी दिली. सलामीवीर टॉम लँथमला ३० धावांवर अश्विनने माघारी तंबुत पाठवले. यानंतर दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवेने कर्णधार केन विल्यमसन सोबत संघाचे शतक पुर्ण केले. यादरम्यान कॉनवेने स्वत:चे वैयक्तिक अर्धशतक झळकावले. मात्र ५४ धावांवर त्याला इशांत शर्माने बाद करत न्युझीलंडला दुसरा धक्का दिला. यानंतर न्युझीलंडने अधिक पडझड होऊ दिली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्युझीलंडच्या संघाने २ गडी गमावत १०१ धावांची मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांच्या वाहनाला अपघात! आरोपी चे मेडिकलकरून पोलीस ठाण्यात जात असलेल्या टू मोबाईल वाहनाला दुचाकीची धडक
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
