Share

‘…तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ’, नाना पटोलेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: 

मुंबई : गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसराच वर्धापन दिन होता. या दिनाचं औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नाऱ्यावरून टार्गेट केलं. ‘अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील,’ असे मत त्यांनी यावेळी बोलताना मांडले.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजपवाले पण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही. आम्ही कोरोना काळात जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे आम्हाला जोडे मारण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. ते पक्षप्रमुख म्हणून बोलले. त्यामुळे ते असं वाक्य बोलले असतील. जर हे काँग्रेसबाबत बोलल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेण्यात गैर काय आहे’. असं नाना पटोले म्हणाले आहे. पटोले यांच्या या हुंकारानंतर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!