लातूर: औसा येथील पालिकेच्या कार्यालयाला टाळे लावून कामकाजाला अडथळा आणणे व पाण्याच्या टाकीवर चढून पाणीपुरवठ्यात अडथळा आणल्याप्रकरणी औसा पालिकेतील भाजपाचे गटनेते सुनिल उटगे व नगरसेवक उन्मेश वागदरे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई करत आदेशाच्या तारखेपासून पुढील पाच वर्षे त्यांना पालिका सदस्य अथवा इतर स्थानिक प्राधिकरणाचा सभासद होण्यास अपात्र ठरवले आहे. या प्रकारामुळे येथील भाजपात कमालीची अस्वस्थता बघायला मिळत आहे.
नगरविकास मंत्र्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, औसा पालिकेचे सदस्य सुनिल उटगे व उन्मेश वागदरे यांनी १४ जून २०१८ रोजी पालिकेच्या कार्यालयात गोंधळ घालून पालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे पालिकेच्या आणि नागरिकांच्या आवश्यक कामात आडथळा निर्माण झाला. त्याचप्रमाणे या दोघांनी ६ जुलै २०१८ रोजी तहसील कार्यालयाजवळच्या जलकुंभावर चढून त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. त्यामुळे पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊन चार तास पाणी पुरवठ्यात खंड पडला. या प्रकरणी नगराध्यक्षांनी उभयतांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी खुलासाही सादर केला. या खुलाशाला सभेमध्ये वाचन करुन त्याला अमान्य करुन त्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या अहवालावरुन व प्रकाशित झालेल्या बातम्या, फोटोवरुन सुनिल उटगे व उन्मेश वागदरे हे कार्यालयाच्या जिन्यावर बसून गेटला कुलुप लाऊन बसलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे ते जलकुंभावर चढून कार्यकर्त्यांसह गोंधळ घालून पाणी पुरवठा करण्यास आडथळा करीत असल्याचे नमुद आहे. या सर्व बाबींवर लातूर जिल्हाधिकारी यांनी २८ डिसेंबर २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्यास सांगितले असता सुनावणीच्या वेळी संधी दिली असतानाही त्यांनी खुलासा सादर केला नाही.
महत्वाच्या बातम्या
- “स्वबळाची भाषा राष्ट्रवादी करत नाही”, टोंपेंचे ‘स्वबळावर’ स्पष्टीकरण
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
