🕒 1 min read
मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते.
प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांचे शिवसेनेसोबत संबंध आहेत. याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
‘शिवभोजन थाळीचं नंतर बघू, अगोदर शिवसैनिक सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची ‘आतमध्ये’ भत्ता मिळण्याची व्यवस्था करा! वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू, तेवढेच पुण्य लागेल,’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांच्या राड्यावर भाष्य करताना भाजपला लक्ष्य केलं होतं.
शिवभोजन थाळीचं नंतर बघू,
अगोदर शिवसैनिक सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची 'आतमध्ये' भत्ता मिळण्याची व्यवस्था करा!
वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू, तेवढेच पुण्य लागेल!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 17, 2021
‘भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका,’ असा सज्जड दमच संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. संजय राऊत यांच्या याच विधानाला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र येऊन चहा पितात – चंद्रकांत पाटील
- ‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला
- कसोटीचे महाभारत! सामना सतरावा/अखेरचा, पंतच्या शतकापुढे इंग्लड चारीमुंड्या चित
- गाझियाबाद प्रकरणाविषयी ट्विट करत जावेद अख्तरांनी व्यक्त केला संताप
- खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
