🕒 1 min read
औरंगाबाद : ग्रामीण पोलीसांनी संघटित गुन्हेगारीवर पोलीसांचा वचक निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला नक्कीच हादरा बसला आहे. मोक्का कायद्याअंतर्गत दोषी आरोपीची लवकर सुटका होत नाही. यामुळे या आरोपींना बराच काळ जेल मध्ये रहावे लागते.
पोलीसा ठाणे फुलंब्री अंतर्गत साताळा शिवारात असलेल्या राधागोविंद सेवा मिशन आश्रमावरील दरोडयाचा तपास करतांना एकुण १३ जणांना अटक करण्यात आली होती. करणसिंग ऊर्फ कन्हैय्या ऊर्फ कन्नु महादु सोळंकी रा. खडी क्रेशर जवळ सांवगी यांने गुन्हेगारांची टोळी संघटित करून घटळास्थळाची रेकी करत, कट रचुन आश्रमरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर तपासात सर्व आरोपी पोलीस अभिलेखावरिल सराईत व अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-१९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची परवागी दिल्याने, या गुन्हयात आरोपी विरूध्द सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून सर्व बाबीचा बारकाईने तपास करून सर्वांविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले असल्याचे ग्रामीण पोलिसांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
