Share

पिशोर-सिल्लोड रस्त्यालगत आढळला वृद्धाचा कुजलेला मृतदेह

Published On: 

औरंगाबाद : पिशोर सिल्लोड रस्त्यालगत राशा टेकड लगत असलेल्या नाल्यात एक पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. दुपारी दोन वाजे दरम्यान उघडकीस आली. शाम भगवान दांडगे (५०) रा. जाधव गल्ली पिशोर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, राशा टेकडी नजीक एका पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकरी व नागरिकांना याची माहिती देण्यात आली. सदरील व्यक्ती पिशोर मधील जाधव गल्ली भागातील शाम भगवान दांडगे असे असल्याची माहिती मिळाली.

यावरून दांडगे यांच्या पत्नी व मुलांना बोलावून शहानिशा केली असता ते शाम दांडगे हेच असल्याची खात्री पटली. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. बावस्कर यांनी जागीच शवविच्छेदन केले. रात्री आठ वाजेच्या सुमारास दांडगे यांचा अंत्यविधी करण्यात आला. पिशोर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!