🕒 1 min read
जालना : जाफराबाद येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याचा आरोप करुन दोन पीएसआय आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलिसांची काहीच चूक नसताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. या वेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. या वेळी गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरण ऐकून घेतले. यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणतीच चूक नव्हती. अशा प्रकारे जर पोलिसांवर जर चुकीची कारवाई होत असेल तर पोलिसांनी काम कसे करावे, असा सवाल खोतकर यांनी वळसे पाटील यांना केला. त्यानंतर वळसे पाटील यांनी हे निलंबन मागे घेण्यात येईल, असा शब्द दिल्याचे खोतकर यांनी सांगीतले.
काय आहे प्रकरण?
कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. याबाबत दानवे यांनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या अशी लेखी तक्रार केली होती.
दरम्यान, खोतकर यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनाही याची माहिती दिली. आता खोतकर यांनी हा विषय थेट गृहमंत्र्यांकडे पोहोचल्याने त्यांनी दानवे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याचे दिसते आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी खतांच्या अनुदानात आणखी वाढ
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा
- ‘पदोन्नती आरक्षणावर महाराष्ट्र ढवळून काढणार’, ऊर्जामंत्री राऊत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
