Share

‘काँग्रेसची असेल तर शिवसेनेचीही स्वबळाची तयारी’, मंत्री अब्दूल सत्तार यांचा निर्धार

Published On: 

जालना : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार पुढील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत. विरोधी पक्ष भाजपशिवाय त्यांच्या या भूमिकेला अद्याप कोणी गांभीर्याने घेतलेले नाहीये. पण आता शिवसेनेचे मंत्री अब्दूल सत्तार यांनी पटोलेंच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

‘काँग्रेसची स्वबळाची तयारी असेल तर तर आमचे ही एकला चलो रे हेच भविष्यातील धोरण आहे. पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यानंतरही ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, आम्ही सर्व निवडणुका धनुष्यबाणाच्या चिन्हावर आणि स्वबळावरच लढवणार आहोत’, असा निर्धार सत्तार यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

पटोलेंना टोला लगावताना ते म्हणाले की, ‘पुढच्या भविष्यात ज्याला मुख्यमंत्री व्हायचे असेल त्याची संख्या त्यांना निवडून आणावी लागेल आणि संख्या काँग्रेसची निवडून आली तर ते जरूर मुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात आज जो पाच वर्षांचा ठरलेला कार्यक्रम आहे, त्यातील दिड वर्षे संपली आहेत. पुढचे साडेतीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यापुढे शिवसेना हाच महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील. त्यामुळे भविष्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहतील.’

मनपाबाबतीत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला की मंजूर होईल
आमची जालन्यातील सर्व जागा लढण्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्यांदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणूका आम्ही पूर्ण स्वबळावर लढवणार व पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार पुढच्या भविष्यातील आमची रणनिती हीच आहे. तसेच जालना महापालिका करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी मागणी केली आहे. त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला की मंजूर होईल व मुख्यमंत्री त्याची घोषणा करतील असे सत्तार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!