Share

संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक, चर्चा करुन मार्ग काढूया – सतेज पाटील

Published On: 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

‘संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. संभाजीराजे यांना उद्याच्या उद्या वेळ द्यायला तयार आहोत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया’. असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. तर, ‘हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही’, असं आश्वासन सतेज पाटील यांनी दिलं.

कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. उच्च न्यायालयात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. हे आंदोलन ज्या उद्दिष्टाने सुरु केलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जावं. सरकारने काही केलं नाही हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे आधीचे वकील होते तेच मुद्दा मांडत होते, मात्र कोर्टाचा निर्णय विरोधात आला, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!