नागपूर : चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरु झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातीलही व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे. मागच्या २७ वर्षापासून दारूबंदी असलेल्या ह्या जिल्ह्यात शेकडो गावात संघटना व महिलांनी प्रभावीरित्या दारूबंदी लागू केली आहे. असेही त्यामध्ये ग्रामस्थांनी म्हटले आहे.
सरकारने १ एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. मात्र, २७ मे रोजी मंत्रिमंडळाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सुरु करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू पुन्हा सुरु झाल्यास दारूबंदी असलेल्या लगतच्या गडचिरोली जिल्ह्याला निश्चितच धोका होणार आहे. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीत वाढ होईल. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करून याची जबाबदरी घ्यावी अशी मागणी गडचिरोलीतील गावांनी केली आहे.
दारूमुळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरी, गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मूळ कारण दारू आहे. मग अशा दारूसारख्या पदार्थाला सरकारने प्रोत्साहन का द्यावे, असा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी सरकारला उपस्थित करीत चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यासंदर्भातील निर्णयाचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी सत्कार सोहळा, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
- ‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र, त्यांच्या विनोदी शैलीचे कौतुकच’, राऊतांची प्रतिक्रिया
- बाजारभावापेक्षा कमी किमतीतच जमीन खरेदी, राममंदिर ट्रस्टचा खुलासा
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
