नवी दिल्ली : अयोध्येत श्रीरामभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून पेटलेल्या वादावर ट्रस्टने स्पष्टीकरण दिले आहे. बाजारभावापेक्षा कमी किमतीतच ही जमीन खरेदी केली असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. तर, या प्रकरणात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही ट्रस्टच्या बचावार्थ उतरला आहे.
काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाने या प्रकरणात चौकशीची मागणी लावून धरली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले आहे की, ज्या जमीन खरेदीवरून वाद आहे ती जमीन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. भविष्यात तेथे राम मंदिराकडे जाणारा चौपदरी रस्ता होईल. ही १.२०८० हेक्टर जमीन १,४२३ रुपये चौ. फूट भावाने खरदी करण्यात आली आहे. अयोध्येत या भागात असलेल्या जमिनीच्या दरापेक्षा हा दर खूपच कमी आहे.
या जमिनीसाठी २०११ पासून ९ जणांनी वेगवेगळे करार केले. परंतु, ते पूर्ण होऊ शकले नाहीत. यानंतर ट्रस्टने पुढाकार घेत मूळ मालकाकडूनच ही जमीन खरेदी केली आहे. सर्व पैसे थेट बँक खात्यात देण्यात आले आहेत. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आली आहे.
त्यापैकी तीन व्यक्ती मुस्लीम
ही जमीन खरेदी करण्यास प्रथम न्यासाला स्वारस्य होते, परंतु जमिनीची मालकी स्पष्ट व्हावी यासाठी न्यासला यापूर्वीच्या करारांना अंतिम स्वरूप द्यावयाचे होते, गेल्या १० वर्षांपासून जवळपास नऊ व्यक्ती करारात सहभागी होत्या आणि त्यापैकी तीन व्यक्ती मुस्लीम आहेत. या सर्वाशी संपर्क साधण्यात आला आणि चर्चा करण्यात आली. त्यांची मान्यता मिळाल्यावर ते पूर्वीच्या करारांबाबत निर्णय घेण्यासाठी एकत्र आले. जमिनीच्या अंतिम मालकांसमवेत पारदर्शक पद्धतीने करार करण्यात आला, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- ‘डब्ल्युटीसी अंतिम एकादशमध्ये ‘या’ दोन्ही खेळाडुंचा समावेश व्हावा’, लक्ष्मणने व्यक्त केली इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
