🕒 1 min read
पनवेल : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले विवेक पाटील यांना मंगळवारी मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी अटक केली. कर्नाळा बँक घोटाळ्यात विवेक पाटील हे मुख्य आरोपी असून अनेक दिवसांपासून पाटील यांची अटकेची शक्यता वर्तविण्यात येत होती.
फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र गृह खातं कर्नाळा बँक प्रकरणात चौकशी करण्यात चालढकल करीत असल्याने अखेर पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण भाजप आमदार महेश बालदी यांच्याकडून ईडीकडे मार्च 2020 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीनं याप्रकरणी तपास सुरु केला. चौकशी अंती अखेर विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
कर्नाळा बँकेत शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.
यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना ईडी कार्यालयात बोलवलं होतं. दोन्ही आमदारांनी आपले म्हणणे ईडी कार्यालयात जाऊन मांडले होते. घोटाळ्यासंदर्भातील पुरावे सादर केले असल्याची माहिती पुढे आली होती. आता याच प्रकरणात पाटील यांना अटक झाली आहे.
दरम्यान, विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ईडीच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी या पैशांचा चुकीचा वापर करत बेनामी संपत्ती, खोटे स्टॅम्प शिक्के तसेच खोटा कर्जदार दाखवून पैसे लाटण्यात आलेत असेही ते म्हणाले. माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह गैरव्यवहारात मदत करणाऱ्या मंडळींवर सुद्धा ईडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
