Share

महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना आजपासुन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

मात्र या दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ आजपासुन म्हणजे १६ जुन पासुन इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याचे वैशीष्ट म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघा तब्बल सात वर्षानंतर कसोटी सामना खेळणार आहे. या संघातील मोजक्याच खेळाडुंना कसोटी सामन्याचा अनुभव आहे. मात्र तोही सात वर्षापुर्वीचा. तेव्हा आजपासुन सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेरचा कसोटी सामना हा ७ वर्षापुर्वी २०१४ साली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या दौऱ्यात महिला संघाला एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. २७ जुन ते १५ जुलै या कालावधीत एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळविण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!