Share

सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती

Published On: 

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अनेक मराठा तरुणांनी बलिदान दिले. बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना आधार देण्यासाठी  एसटी महामंडळाने घरातील एका सदस्यच नोकरी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करत एसटी महामंडळाने जिल्ह्यातील तीन जणांना २७ मे रोजी नियुक्ती देऊन आश्वासनपूर्ती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मराठा समाजाच्या आरक्षणाची मोर्चेबांधणी औरंगाबादेतून झाली. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर झाली मूक मोर्चा, ठोक मोर्चा, रास्ता रोको आंदोलनानंतर ही शासनाकडून सकारात्मक निर्णय येत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्य पसरले होते. या नैराश्यातून स्थानिक तरुणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. औरंगाबाद जिल्ह्याचे अगर कायगाव येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी पहिले पाऊल उचलत कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन बलिदान दिले. त्यानंतर बलिदानाची मालिका सुरू झाली. आरक्षणासाठी जिल्ह्यातील सात जणांनी बलिदान दिले.

बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका सदस्याला एसटी महामंडळाने नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तयारी केली आणि जिल्ह्यातील तिघांना २७ मे २०१९ रोजी १८ दिवसांपूर्वी विविध पदांवर नियुक्ती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले यांचा स्वकीयांना नोकरीत सामावून घेण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक माधव काळे यांनी पहिल्या दिवसांपासून प्रयत्न केले.

या प्रयत्नामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सुनील शेळके, रवी चौधरी, भगवान सोनवणे या ठिकाणी एसटी महामंडळाने विविध पदांवर नियुक्ती पत्र देऊन आपल्या आश्वासन पूर्ण केले. या तिघांना सध्या नियुक्ती दिली जाते याचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या विभागातील जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!