🕒 1 min read
मुंबई : राज्यात मे महिन्याच्या अखेरीस दैनंदिन रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसून आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळेच आता मुंबईकरांच्यादृष्टीने महत्वाची असलेली लोकल सेवा सर्वांसाठी कधी पासून सुरु, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान आता मिळालेल्या माहितीनुसार मुंबई लोकल बाबतचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. मुंबई लोकलबाबत गुरुवारी म्हणजेच १७ जून रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे आता राज्य सरकार गुरुवारी लोकल संदर्भात निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एमएमआर परिसरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असं ककाणी यांनी सांगितलं आहे.
सध्या मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येऊ लागलीय. मुंबईतल्या झोपडपट्टी विभागानं कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केलीय. मात्र, उच्चभ्रु वस्तीची चिंता अद्याप कायम आहे. सध्याच्या घडीला मुंबईत 83 इमारती सिल्ड आहेत तर केवळ 22 ठिकाणी झोपडपट्टी आणि चाळींमध्ये कंटेंटमेंट झोन राहिले आहेत. 24 पैकी 18 वॉर्डमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मुंबईतील सर्वाधिक धोका असलेल्या दाटीवाटीच्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींच्या पुरवठ्याबाबत भारत बायोटेकने घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार ?
- ‘मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षाही नाही ‘
- Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू
- ‘धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा’
- औरंगाबादेत भूमिगत गटार योजना झाली ‘भूमिगत’! मात्र नागरिकांकडून सक्तीने करवसुली सुरूच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
