Share

राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम संथगतीने; शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी

Published On: 

लातूर: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. यावर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण तसेच दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश येथील अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित गुत्तेदार यांनी हे काम गुणवत्तापूर्ण व अधिक गतीने होण्यासाठी मशिनरीची संख्या वाढवावी व शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत हे काम पूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ या रस्त्याच्या कामाची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी करून उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे व इतर मान्यवर उपस्थित होते. बनसोडे पुढे म्हणाले की, या रस्त्याच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याने गुत्तेदाराने प्रथम मशनरी ची संख्या वाढवून कामाची गती वाढवावी व काम ही गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे याबाबत दक्ष राहावे.

तसेच पावसाळा सुरू झाला असून रस्त्यांच्या कामामुळे लगतच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाणार नाही व साचणार नाही याची दक्षता गुत्तेदार यांनी घ्यावी. या सर्व कामावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियंत्रण ठेवून संबंधित गुत्तेदार यांच्याकडून विहित मुदतीत काम पूर्ण करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. आजपासून पुढील एका महिन्याच्या काळात जर संबंधित गुत्तेदार यांनी रस्त्याच्या कामाची गती वाढवली नसल्याचे दिसून आल्यास त्यांच्या विरोधात निवेदनातील तरतुदीप्रमाणे राज्य रस्ते विकास मंडळाने कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!