Share

डब्ल्युटीसी फायनलपुर्वी न्युझीलंडच्या ‘या’ गोलंदाजाने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन

Published On: 

इंग्लंड : न्युझीलंड आणि इंग्लंड या दोन संघात ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडच्या गोलंदाजानी विजय निश्चित केला आहे. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ९ गडी गमावत १२२ धावा जोडल्या होत्या. इंग्लंडच्या संघाकडे अवघ्या ३७ धावांची आघाडी आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ३०३ धावांची मजल मारली. या डावात सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॅनियन लॉरेन्सने प्रत्येकी ८१ धावांची सर्वाधीक खेळी साकारली. न्युझीलंडकडुन या डावात ट्रेन्ट बोल्टने शानदार पुनरागमन करत सर्वाधिक ४ गडी बाद केले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. या सामन्याआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे, यातल्या दुसऱ्या सामन्यात रॉस टेलर आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी धमाकेदार कामगिरी केली आहे.

ट्रेन्ट बोल्टने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. बोल्ट भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा न्यूझीलंडचा चौथ्या क्रमांकाचा बॉलर आहे. ट्रेन्ट बोल्ट आणि रॉस टेलर यांचा इंग्लंडविरुद्ध फॉर्म बगता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियापुढे नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!