🕒 1 min read
इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. टायटल सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. टीम इंडियाच्या या सराव सामन्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
टीम इंडिया कोणत्याही सामन्याचा सराव न करता अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारतीय खेळाडू प्रथम मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलीकरणात होते आणि नंतर इंग्लंडमध्ये आल्यानंतरही टीम इंडिया विलगीकरणात होती. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर टीम इंडियाने मैदानावर सराव करण्यास सुरवात केली.
https://twitter.com/BCCI/status/1403570720228085763?s=20
टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वत:ला सज्ज करण्यासाठी एक इंट्रा स्क्वाड मॅचही खेळली. या मॅचमध्ये ऋषभ पंतनं जोरदार बॅटींग केली. ऋषभ पंतनं या मॅचमध्ये अर्धशतक झळकावत फॉर्मात असल्याचं दाखवून दिले. या मॅचमध्ये बॅट्समन आणि बॉलर्सच्या दोन वेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या. ऋषभ पंतने अर्धशतक झळकावत न्यूझीलंडला इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
