अहमदनगर : खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.
त्यानंतर संभाजीराजे छत्रपती शनिवारी (१२ जून ) कोपर्डीत येणार आहेत. यावेळी ते कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर संभाजीराजे यांच्याकडून मराठा आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. साधारण दुपारी दोनच्या सुमारास संभाजीराजे कोपर्डीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्नांवर आणि प्रस्तावित मोर्चाच्या संबंधित संभाजीराजे हे खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात काल ( शुक्रवार ११ जून ) भेट घेणार होते. मात्र ही भेट पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नव्या इंनिगंसाठी ‘राणादा’ सज्ज; न्यु लुक्सची सर्वत्र चर्चा.
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
