कणकवली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता.आता काहीअंशी रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याचे समोर येत आहे. अशा कठीण काळात गावगाड्याचा कारभार चालविणाऱ्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंचांना आमदार नितेश राणे यांनी आधार दिला आहे.
राणे यांनी आपल्या मात्दारारातील सरपंचांना प्रत्येकी ३ लाखांचा आरोग्य विमा आणि ७ लाख ५० हजारापर्यंतचा मोबदला मिळेल असे विमा कवच दिले जाणार आहे. राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखांचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच रुग्णवाहिकेपासून व्हीआयपी उपचार पद्धती यात लागू होणार आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारही या विमा कवचमध्ये समाविष्ट केले आहेत.
येत्या चार दिवसांत सर्व सरपंचाचे विमा उतरण्याची प्रक्रिया देशातील चोला मंडलम या प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण केली जाईल, अशी माहिती राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या मतदारांनी मला निवडून दिले आहे त्या सर्वांचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नीतेश राणे यांनी दिली.
या विमा कंपनीशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत. अजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत. कोरोनामुक्त गावाबरोबरच तो भयमुक्त करणे गरजेचे आहे. सर्वच सरपंच या फ्रंटलाईनवर काम करतात त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. त्यामुळे माझ्या मतदार संघातील सरपंचांपासून सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्हा हा राणे कुटुंबीयांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली की संपूर्ण जिल्ह्यासाठीही निश्चितच विचार करू.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
