Share

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Published On: 

मुंबई : संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ अद्यापही कायम आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू नक्की कसा झाला याचा उलगडा काही केल्याने होत नाही. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए अनेक दिवसांपासून तपास करत आहे, मात्र मनसुख हिरेन यांचा मृत्यू नक्की कसा झाला याचा छडा लावण्यात त्यांना अपयश आले आहे.

मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही. अशी नवी माहिती अवहालातून समोर आली आहे. यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.

मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल सवाल उपस्थितीही केला होता.

याधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या टीमकडे आला होता. हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे. पण, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!