औरंगाबाद : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी परिसर, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यान यासह शहरातील विविध भागात दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. खामनदीवर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते तर प्रियदर्शनी उद्यान येथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यानात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. खामनदी येथे दोन हजार, प्रियदर्शनी उद्यान येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक उद्यान येथे सातशे, महानगर पालिकेच्या शाळां व आरोग्य केंद्र येथे सातशे, सातारा परिसर पाचशे, बीड बायपास पाचशे व नागरिकांनी आपआपल्या परिसरात एक हजार असे एकूण दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमध्ये आंबा, सिताफळ,चिंच, जांभूळ,आवळा,नारळ,करंज, पिंपळ, लिंब, बेहडा, बांबू, ताम्हण, अर्जुन, कांचन,चाफा,मोह आदी विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, शहर अभियंता एस.डी. पानझडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, सिद्धार्थ उद्यान अधीक्षक विजय पाटील , कार्यकारी अभियंता बी.डी. फड, के. एम. फालक, माजी नगरसेवक प्रशांत देसरडा, महानगरपालिका शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक कार्य व जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार, यांत्रिकी विभागाचे पंडित,स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, इको सत्वच्या नताशा झरिन, मनपा वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान, तौकीर अहमद, प्रयास ग्रुपचे सदस्य व पर्यावरण प्रेमी तसेच नागरिक आदींनी उपस्थित राहून वृक्षरोपण केले.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
- कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून वकीलासह बेरोजगारांना गंडविणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
- ट्विटरवर केंद्राचा दबदबा ; इशारा देताच मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले
- ‘तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल’ ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
