🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री किरण खेर सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आणि उपचार सुरु झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी किरण खेर यांची पहिली झलक पाहायला मिळालीय. किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेरच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये किरण खेर यांची झलक पाहायला मिळाली. या आधी अनुपम खेर यांनी किरण खेर यांची प्रकृती आता ठीक असल्याचं सांगितलं होतं. मल्टीपल मायलोमा या एका प्रकारच्या कॅन्सरशी त्या लढा देत आहेत.
https://www.instagram.com/tv/CPn_GNKgkUk/?utm_source=ig_web_copy_link
सिंकदर खेरने शेअर केलेल्या व्हिडीओत किरण खेर यांना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. या व्हिडीओत त्या सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसतेय. यात किरण खेर कमकुवत दिसत आहेत. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य मात्र आजही कायम आहे. या व्हिडीओत किरण खेर यांंनी चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानले आहेत.
लाईव्ह सेशनचा हा व्हिडीओ शेअर करत सिकंदर कॅप्शनमध्ये म्हणाला, “खेर साहेब आणि किरण मॅम. हा छोटासा आणि सुंदर व्हिडीओ, माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून हॅलो. तुम्ही माझ्या आईसाठी दाखवलेल्या प्रेमासाठी तुमचे आभार” अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलंय. या व्हिडीओत सिकंदरने किरण खेर यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच किरण खेर मुलाला लग्न करण्याचा सल्ला देत असल्याचं लक्षात येतंय “काही महिन्यात आता तू ४१ वर्षांचा होशील” असं त्या म्हणत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊंनी आग्रह केला, ‘जेवण करून जा!’; फडणवीस म्हणाले, ‘आज नको, पुढच्या वेळी नक्की करेन’
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
