🕒 1 min read
नांदेड: जिल्ह्यात किनवट तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जंगलात नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केल्याची घटना तालुक्यातील वडोली जंगल परिसरात घडली आहे. याप्रकारामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वडोली येथील दत्त मंदिराकडे जाणाऱ्या जंगलातील रस्त्यावर १ जून रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बबिता मंगेश आडे या महिलेचा मृतदेह सापडला.
त्या महिलेचा दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. किनवट पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पंकज सुभाष जाधव (४६, रा. पालाईगुडा ता. माहूर, ह.मु. सुरदासपूर मंडल नेरडगुंडा जिल्हा आदिलाबाद) याने तिचा खून केला. बबिता आडे ही पंकज जाधवची प्रेयसी होती. १ जून रोजी पंकज जाधवच्या मुलांना भेटण्यासाठी पालाईगुडाला का येत नाही, या कारणावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून माथेफिरू प्रियकराने तिला दगडाने ठेचून जिवे मारुन टाकले.
प्रयेसीला माथेफेरु प्रियकराने दगडाने ठेचून निर्घण खून केला असल्याने समाजात उलट सुलट चर्ची सुरु झाली आहे. किनवट पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पंकज जाधवला घटनास्थळावरूनच अटक केली आहे. दरम्यान मयत प्रेयसीसोबत भांडण करून खून केल्यानंतर आरोपीला जमावाने पोलीस येईपर्यंत जागेवरच रोखून धरले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…हा शब्द देतो’; गोपीनाथरावांच्या पुण्यतिथीदिनी धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट !
- लातूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक! १५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २५ रुग्णांचा मृत्यू
- मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेचं चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान
- HSC : बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब !
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली


