🕒 1 min read
मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
राज्यात आज 14,123 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. आज रोजी एकूण 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,31,319 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 % एवढे झाले. राज्यात आज 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 17,68,119 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झालीये; फडणवीसांचा टोला
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
- पुणेकरांनो… सलूनसह ‘या’ गोष्टी बंदच राहणार; राज्य सरकारच्या निर्देशामुळे महापौरांचे यू-टर्न
- मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, आम्ही फक्त ५ वर्षे सत्तेसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आलोय – नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
