🕒 1 min read
मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान शनीवारी २९ मे रोजी बीसीसीआयने स्पर्धेतील उर्वरीत सामन्याची घोषणा करुन सर्व चर्चांना पुर्णविराम दिला.
मात्र, बीसीसीआयने ज्या काळात उर्वरीत आयपीएल स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. त्याच काळात वेस्ट इंडिज येथे कॅरेबीयन प्रिमीअर लीग ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. सीपीएलचा अंतिम सामना हा १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. आणि जर आयपीएल स्पर्धा जर १९ सप्टेंबरच्या आधी सुरु झाली तर या स्पर्धेतील सहभागी विदेशी खेळाडू हे आयपीएलमध्ये सहभाग नोंदवू शकणार नाहीत. यावर उपाय शोधण्यासाठी बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहे.
उर्वरित आयपीएल स्पर्धा कधी होणार याचा कोणताही निर्णय अजून जाहीर झालेला नाही. मात्र या स्पर्धेचा दुसरा टप्पा 17 सप्टेंबर रोजी सुरु होईल तर फायनल मॅच 10 ऑक्टोबर रोजी असेल, असे वृत्त ‘इनसाईड स्पोर्ट्स’ ने दिले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेमुळे बीसीसीआयने अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्नशील राहू : देवेंद्र फडणवीस
- उस्मानाबादेत घटतीये रुग्णांची संख्या
- दिल्ली कॅपीटल्सनंतर ‘या’ दोन संघाचे कर्णधार बदलले जाणार
- बीड जिल्ह्यात लहान मुलगी व वनरक्षकाची आत्महत्या!
- अखेर तो दिवस आला ! ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बऱ्याच महिन्यानंतर कुटुंबाशी भेट ; पहा भावुक करणार व्हिडीओ

