🕒 1 min read
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याच पुण्याईवर चालला आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
यानंतर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेसह संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिदुत्वानंतर आता बाळासाहेबांचे विचार सोडल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेने पूर्ण सोडून दिले यांचे उदाहरण म्हणजे संजय राऊत यांची ही विधाने. देशांतील समस्यांबाबत काँग्रेसवर बाळासाहेब प्रखर टीका करायचे. आज काँग्रेसच कौतुक राऊत करीत आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडले,’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे केला आहे.
शिवसेनाप्रमुख मा. #बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार शिवसेनेने पूर्ण सोडून दिले यांचे उदाहरण म्हणजे @rautsanjay61 यांची ही विधाने. देशांतील समस्यांबाबत काँग्रेसवर बाळासाहेब प्रखर टीका करायचे. आज काँग्रेसच कौतुक राऊत करीत आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचेविचार ही सोडले pic.twitter.com/JPlHQrN2v1
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 30, 2021
काय म्हणाले होते संजय राऊत ?
‘सरकारने राहुल गांधी यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले पाहिजे. कोरोनामध्येच सरकारची दोन वर्षे तर निघून गेली. देशासाठी अजून बरच काही करणे बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच्या पुण्याईवर देश चालत आहे. नवीन काही झालेले नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,’ असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सरसकट महाराष्ट्राला शिथिलता मिळणार की निर्बंध कायम राहणार ? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद
- देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा ; नाना पटोलेंचा घणाघात
- काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच देशाचा कारभार सुरु : संजय राऊत
- श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर केलेल्या ‘या’ चुकीमुळे तमिम इक्बालने ठोठावला दंड
- ‘औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांत पाटलांना अजित पवार दिसतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

