Share

‘पश्चिम बंगालसाठी मोदींच्या पायाही पडले असते, पण अपमान असह्य’, ममता बॅनर्जींचा पुन्हा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा केंद्र सरकारवर घणाघात केला. ममता म्हणाल्या, “केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मला जर सांगितले असते तर मी बंगालच्या जनतेसाठी पंतप्रधानांच्या पायाही पडले असते. मात्र अपमान कधीही सहन करणार नाही.’

ममता म्हणाल्या, मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय यांना दिल्लीला बोलावण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा. त्यांची काय चूक? त्यांना कोरोना संकटात लोकांसाठी काम करण्याची परवानगी दिली जावी. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा राज्य सरकारला अडचणीत आणत आहेत. त्यांना निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नाही.

त्या म्हणाल्या, की मुळात एटीसीनेच मला वीस मिनिटे उशिराने यायला सांगितले होते. कलाईकुंडा येथील हवाईतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर मी तिथे रवाना झाले. प्रत्यक्ष कलाईकुंडा येथेही मला पंधरा मिनिटे उशिरानेच सोडण्यात आले, तोपर्यंत पंतप्रधान मोदी तिथे पोचले होते. यावेळी मी पंतप्रधानांना भेटू द्या अशी विनंती अधिकाऱ्यांकडे केली पण मला उशिराने परवानगी देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!