Share

निवृत्तीनंतर हाशिम आमला पाडतोय काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू सलामीवीर हाशिम आमलाने अनेक वर्षे दक्षिण अफ्रिकेकडून सलामीला खेळला आहे. यादरम्यान आमलाने दक्षिण अफ्रिकेच्या संघासाठी शानदार कामगीरी केली. २०१९ मध्ये आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.

मात्र निवृत्तीनंतरही तो इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. नुकत्याच केलेल्या एका खेळीद्वारे त्याने सिद्ध केले आहे की त्याच्या फलंदाजीची धार अजुनही कमी झालेली नाही. काउंटीमध्ये ग्लूस्टेशायर संघाचे प्रतिनिधीत्व करताना हाशिम आमलाने शानदार शतकीय खेळी केली. यावेळी आमलाने ३४७ चेंडुत १६ चौकाराच्या सहाय्याने १७३ धावांची खेळी केली. आमलाच्या शतकीय खेळीमुळे ग्लूस्टेशायरच्या संघाने ४७३ धावांचा डोंगर उभारला. याच स्पर्धेत हॅंपशायर संघाविरुद्ध आमलाने २१५ धावांची द्विशतकीय खेळी केली होती.

२०२१च्या कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडू हाशिम आमला हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या हंगामात त्याने ५७.७०च्या सरासरीने ५७७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमलाने १२४ कसोटी सामन्यात ९२८२ धावा केल्या आहेत. आमलाने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ शतके झळकावली आहेत. यात ४ द्विशतकाचा समावेश आहे. तर १८१ एकदिवसीय सामन्यात ८११३ धावा केल्या आहेत यात २७ शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!