🕒 1 min read
मुंबई : अभिनेता विद्यूत जामवालचं नाव स्टंटबाजबाज ओळखल जात. त्याने अनेक चित्रपटामध्ये आपले स्टंट दाखवले असून तो कमी कालावधीतच अनेकांच्या पसंतीस उतरला. अभिनेता विद्यूत जामवाल हा नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना अॅक्शन ट्रीट देत असतो. जगातील टॉपचे अॅक्शन हिरो आहेत त्यांना आव्हान देणारा हा अभिनेता आहे. अशा या स्टंटबाज अभिनेता विद्यूत जामवालचं नाव आता जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये सामील झालं आहे. सोशल मीडियाद्वारे विद्यूतने ही माहिती दिली असून अनेकांनी त्याचे कौतुक केल आहे.
नुकतीच इंटरनेटवर जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टची यादी जाहीर झाली. यापुर्वी या यादीत की चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा यांची नाव पुढे होत. आता या यादीत अभिनेता विद्यूत जामवालचं सुद्धा सामील झालंय. ही बातमी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत एक स्क्रीनशॉट जोडून ‘जय हिंद, कलारीपयट्टू’ असं लिहिलं आहे.
https://www.instagram.com/p/CPZ6llMHV_x/?utm_source=ig_web_copy_link
जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टच्या यादीत त्याचं नाव आलंय. त्यामुळे विद्यूतचं नाव गुगलवर सर्च केल्यानंतर त्याच्या नावाच्या बाजुला जगातील सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट असं लिहिलेलं दिसेल. त्याने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट मध्ये देखील ते दिसून येत आहे. ही गोष्ट त्यासाठी अभिमानाची असून भारतीयांसाठी देखील अभिमानास्पद बाब आहे.
विद्युत शेवटच्यावेळी फारूक कबीरच्या खुदा हाफिज या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अन्नू कपूर, शिवलिका ओबेरॉय, अहाना कुमरा, शिवा पंडित यांनीही काम केले होते. त्यानंतर आता कनिष्क वर्मा दिग्दर्शित क्रेझ चित्रपटात विद्युत दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
