🕒 1 min read
जालना : नुकतीच जालन्यातील एका खाजगी हाॅस्पीटलमध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. यावेळी पोलीसांनी तिथे धाव घेत गोंधळ घालणाऱ्यांना मारहाण करत गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करणारे भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर नुकताच व्हायरल झाला होता.
शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांनी निलंबित करण्यात आले आहे. जालना पोलीस अधिक्षक यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान,या कारवाईवर देखील आता टीका होऊ लागली आहे.भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन केवळ शिपायांचं निलंबन केलंय. पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी खिरडकर यांच्या कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. ज्यांच्या आदेशावरुन मारहाण झाली, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
ज्यांच्या आदेशावरून जालन्यात युवकाला निघृणपणे मारहाण झाली ते DYSP खिरडकर आणि पोलीसनिरीक्षक महाजन यांना निलंबीत न करता शिपाई आणि फौजदाराचं निलंबन केलं गेलं
ज्यांच्या आदेशावर युवकाला मारहाण झाली त्यांना का वाचवलं जातयं
तात्काळ निलंबीत करा@maharashtra_hmo @DGPMaharashtra @sp_jalna— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 29, 2021
नेमके काय आहे प्रकरण ?
शिवराज नारियलवाले जालना येथील दीपक हॉस्पिटलमध्ये बहिणीचे रिपोर्ट बघण्यासाठी गेले असता, त्यांच्याच समाजातील एका जिम चालकाचा सात एप्रिल रोजी अपघात झाला होता. त्याला देखील तिथेच भरती करण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये जिम चालकाचे मित्र तसेच नातेवाईकांची गर्दी वाढत असल्याने हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली. तसेच नगरसेवक देवावले यांच्याशी उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर हे अर्वाच्च भाषेत संभाषण करू लागले.
चुकीची भाषा शैलीचा वापर खिरडकर करत असल्यामुळे, नारीयलवाले यांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हि बाब खिरडकर यांच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास आली. त्यांनी हि माहिती खिरडकर यांना देताच त्यांनी नारीयलवाले यांचा मोबाईल हिसकावला आणि त्यांना नोंदणी कक्षाच्या शेजारी नेत सहकाऱ्यांसह मारहाण करण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
