Share

अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : चोरलेल्या दुचाकी बँकेने ओढून आणल्याची थाप मारत खेडेगावात विक्री करणा-या अट्टल गुन्हेगाराला ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. रामेश्वर मच्छिंद्र ताजी (वय ३१, रा. लिहा-पारध, ता. भोकरदन, ह. मु. बकवालनगर, वाळुज) असे दुचाकी चोराचे नाव आहे.

करमाडमधून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार नुकताच घडला होता. त्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू होता. वाळुज परिसरातील गुन्हेगाराने दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी रामेश्वर ताजी याला ताब्यात घेतले.

तेव्हा त्याने जालना, बुलढाणा, नाशिक, जळगाव, औरंगाबाद शहर व ग्रामीण भागातून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तसेच बँकेने ओढून आणलेल्या दुचाकी खेडेगावातील गावक-यांना कागदपत्रे नंतर आणून देतो अशी थाप मारुन विकल्याचे सांगितले. त्यावरुन त्याच्याकडून तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!