बीड: गेल्या वर्षी पासून कोरोना महामारीमुळे सगळ्यांचेच आयुष्य बदलले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अर्ध्याहून अधिक वर्ष लॉकडाऊनमध्ये गेलं, त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानंतर २०२१ उजाडल्यावर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट दिसायला लागली आणि पुन्हा कामं सुरू झाले मात्र देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आणि पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले. आणि पुन्हा अनेकांच्या हातचे काम गेले.
जिल्ह्यातील शिरुरघात येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने आता टेम्पोचे हप्ते कसे फेडायचे? या विवंचनेतून ३० वर्षीय टेम्पोचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील शिरूरघाट येथे मंगळवारी सकाळी वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण हरिदास घोडके (३०) असे आत्महत्या केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.
शिरूरघाट येथील लक्ष्मण घोडके या तरुणाने हप्त्यावर टेम्पो खरेदी केला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहतुकीला बंदी असल्याने टेम्पो उभा आहे. जवळ पैसा नाही अाणि हाताला राेजगारही नाही. त्यामुळे टेम्पोचे हप्ते फेडण्यासाठी पैसेच नसल्याने लक्ष्मण घोडकेने नैराश्यातून हनुमंत नामदेव लोंढे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचा भाऊ बळीराम घोडके यांच्या खबरीवरून केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- मराठा आरक्षण : संभाजीराजे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट !
- ‘चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची उत्पत्ती झाली का?’, अमेरिकेचा पुन्हा एकदा चीनवर संशय
- निर्माता करण जोहरने नेहा धुपियाला ‘या’ कारणामुळे लग्नाला दिला तीनदा नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
