मुंबई : आगामी जुन महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू तयारीला लागले आहे. यादरम्यान भारतीय संघाचा महत्वाचा अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाने सोशल मीडीयावर एक फोटो शेअर केला आहे.
जाडेजाने शेअर केलेल्या या फोटोत जडेजासोबत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दिसत आहे. हा फोटो २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील असल्याची माहिती जडेजाने स्वत: दिली आहे. तसेच या फोटोला कॅप्शन देण्यात यावे असे जडेजाने म्हणले आहे. जडेजाने पोस्ट केलेल्या या फोटोत जडेजा समोर आहे तर त्याच्यामागे महेंद्रसिंह धोनी आहे आणि या दोघांच्या मध्ये थोड्या अंतरावर विराट कोहली दिसत आहे.
Imagine your own caption ???? #throwback #englandtour pic.twitter.com/lzGqkV9GVG
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 26, 2021
भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये ६ कसोटी सामने खेळलेले आहे. या सहा सामन्यापैकी केवळ एकाच कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात भारतीय संघाला यश आले होते. तर चार सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले होते. २०११ साली धोनीच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा संघात दिग्गज खेळाडू असताना देखील भारतीय संघाला ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या दौऱ्यात भारतीय संघाला एक सामना जिंकण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- निर्माता करण जोहरने नेहा धुपियाला ‘या’ कारणामुळे लग्नाला दिला तीनदा नकार
- ‘चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची उत्पत्ती झाली का?’, अमेरिकेचा पुन्हा एकदा चीनवर संशय
- बीडमध्ये पोलिसांची पुन्हा एकदा डॉक्टरला मारहाण!
- ‘आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का?,’ आळंदी संस्थानचे पालखी मार्गावरील गावांना पत्र


