🕒 1 min read
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वादा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. ‘आयएमए’कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीण्यात आलं असून यात बाबा रामदेव यांनी एलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय बाबा रामदेव यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.आता त्यांचा पुन्हा एक व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्या मध्ये, किसी का बाप भी मुझे अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या बाबा रामदेव यांच्यावर चांगल्याच संतापल्या आहे. मोदी आणि शाह यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं.
“Arrest to kisi ka baap bhi nahin kar sakta Swami Ramdev ko.”
Sach kahan aapne, Ramkrishna Yadav.
Bhai aur Baap toh Opposition ko arrest karne mein busy hai.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 27, 2021
“स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही.” रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- ‘अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा कशी काय होऊ शकते?’
- ‘शरद पवार यांचा सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल’
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
